औंध:
औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी राहुल प्रकाश गायकवाड यांची बिनविरोध तसेच सचिवपदी गिरीश आत्माराम जुनवणे व खजिनदार पदी हेरंब शरद कलापुरे यांची फेरनिवड करण्यात आली.







मावळते अध्यक्ष योगेश जुनवणे यांनी त्यांना केलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त अध्यक्ष राहुल प्रकाश गायकवाड यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे, सर्व मंदिरे व तालीम यांचे पावित्र्य राखून येणाऱ्या भक्तांचे सुलभ दर्शन कसे होईल, सर्व मंदिरे स्वच्छ व सुंदर कशी राहतील याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहेत.
औंधगाव येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मरीआई माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला आहे. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते.








