दखल मॅक न्यूजच्या बातमीची…
औंध :
औंध रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्पायसर रोड,भाऊ पाटील पडळ वस्ती येथील रस्त्याची झालेली दुरवस्था त्यामुळे होणारे अपघात यामुळे त्या रस्त्यांची दुरुती करणेबाबत तसेच विविध समस्या बाबत मनसेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची बातमी मॅक न्यूजच्या पोर्टलला देण्यात आली होती.
मनसेच्या निवेदनाची व बातमीची दखल घेत प्रशासनाने सदरील रस्त्याची दुरुस्ती केली. डांबरीकरण करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. याबाबत प्रशासनाचे व मॅक न्यूजचे आभार मनसेचे शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांनी मानले. सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा व्हिडिओ व माहितीही न्यूज साठी पाठवली.
प्रशासनाने अशी कामे त्वरित केल्याने प्रभागात असलेल्या विविध समस्या वेळेवर सुटतील. तसेच निवेदनात देण्यात आलेल्या इतर समस्या लवकरात लवकर प्रशासनाने सोडवाव्यात अशीही बोलाडे यांनी सांगितले.