मॉर्डन महाविद्यालयात फूड & ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज येथे अससोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट टेकनॉलॉजि ऑफ इंडिया पुणे चॅप्टर यांच्या सहयोगाने AFST चा वर्धापन दिन (foundation day) व शिक्षक दिन साजरा केला. या दिवशी ‘ फूड & ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. याचे उदघाटन सुरेश अन्नापुरे, जॉईंट कंमिशनर, FDA व गोविंद चितळे डायरेक्टर, चितळे बंधू मिठाईवाले, यांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय खरात म्हणाले, ” फूड इंडस्ट्री मध्ये चितळे बंधू हे जागतिक स्तरावर पोहोचलेले नाव आहे. विद्यार्थ्यांपुढे चितळे बंधू सारखे आदर्श व्यावसायिक येणे हा सुवर्णयोग आहे.”

गोविंद चितळे यांनी विध्यार्थ्यांना चितळे उद्योगामध्ये प्रॅक्टिकल अनुभवासाठी येण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेश अन्नापुरे म्हणाले ‘अनुभवी व्यक्तीचे प्रोत्साहनपर एक वाक्य तुमचे आयुष्य बदलू शकते. उद्योजक होण्यासाठी व तो प्रवास अनुभवण्यासाठी असे कार्यक्रम व्हावेत. ”

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरीत करण्यात आले.

1. प्रेरणा होळकर 2. तनुजा आकर्षे 3. विनय काकरंबे

पोस्टर

1. अपर्णा मोरे 2. आरती तळेकर 3. ओम अडसुल

डॉ. सतीश बोरकडे यांनी या क्षेत्रातील संधी व आमरेंद्र महामुनी, डायरेक्टर, समर्थ टेकनॉलॉजि यांनी फूड लेबलिंग रूल्स अँड रेगुलशन्स या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला MIT कॉलेज, वाघीरे कॉलेज, टी सी कॉलेज, सिमबियॉसिस कॉलेज व मॉडर्न कॉलेज चे 122 विध्यार्थी होते.

पाहुण्यांचे स्वागत डॉ. अंजली भोईटे, प्रेसिडेंट, AFST यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वाझीद खान, सेक्रेटरी,AFST यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मृणाल परदेशीं यांनी केले. प्रा. भाग्यश्री सरोदे व प्रा. श्रद्धा हेरकर यांनी मदत केली. प्रा. सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह , पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले.

See also  विद्यापीठांमधील बंद झालेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात : केंद्रीय कायदा व न्यायमंत्री प्रा. एस.पी. सिंग बघेल