रायगड :
रायगडमधून धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. रायगडमध्ये शालेय क्रिडा स्पर्धेत स्पर्थकाने फेकलेला भाला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यातील पुरार येथील शाळेतील घटना
आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रायगडच्या पुरार येथील शाळेत शालेय क्रिडा
स्पर्धेदरम्यान भाला फेकचा खेळ सुरू होता. या खेळादरम्यान स्पर्धकाचा भाला विद्याथ्य्याचा डोक्यात घुसला. यामुळे विद्याथ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील पुरार येथे घडली.
हुजेफा डावरे असं मृत विद्याथ्थ्याचं नाव आहे. हा विद्यार्थी दहीवली कोंड येथील रहिवासी आहे. माणगाव तालुका माध्यमिक विभागाच्या वतीने या शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रकराणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घड़लं?
रायगडच्या पुरार येथील शाळेत माणगाव तालुका माध्यमिक
विभागाच्या वतीने शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्था पाहण्यासाठी हुजेफा डावरे देखील आला होता. हुजेफा प्रेक्षकांच्या रांगेत होता. शाळेत शालेय क्रिडा स्पर्थत भाला फेकचा खेळ सुरू होता. त्यावेळी एका स्पर्थकाचा भाला प्रेक्षकाच्या दिशेने गेला. स्पर्धकाकडुन हा भाला विद्याथ्थ्याच्या डोक्यात घुसला. विद्यार्थ्यांच्या डोक्यात भाला घुसल्याने विद्याथ्थ्थाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेला विद्यार्थी हा दहीवली कोंड येथील रहिवासी आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.