पुणे :
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे नवरात्रीचे नऊ दिवस राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व ग्रीन हिल्स ग्रुपचे सदस्य चतृश्रृंगी येथे निर्माल्य गोळा करण्याचे काम केले आहे.







पर्यावरण जागृतीसाठी जे उपक्रम महाविद्यालयात होतात त्यामधील हा एक महत्वाचा उपक्रम महाविद्यालय गेली काही वर्षे राबवित आहे. पुणे परिसरातील चतृश्रृंगी मातेच्या परिसरात नवरात्रात मोठ्या प्रमाणात भक्त जमतात. देविला हार, फुले वाहतात. ते लगेचच निर्माल्यात फेकले जातात. त्यामधील काचा व प्लॅस्टिक वेगळे काढुन हे निर्माल्य टेकडीवर वाहुन नेले जाते. टेकडीवर खड्ड्यात त्यावर प्रक्रिया होउन त्याचे उत्तम प्रतिचे खत तयार केले जाते व टेकडीवरील झाडांसाठी उपयोगात आणले जाते.
या वर्षी १२८( ६२८ किलो) पोती फुले व हार,
प्लॅस्टिक ३८ ( ८५ किलो), आगरबत्ती ११ पोती
गोळा करण्यात आल्या.
या मधील हारफुले डोंगरावरच्या खड्यात खत होण्यासाठी टाकण्यात आले. सर्व प्रक्रियेनंतर हेच खत चतुर्श्रुंगी टेकडीवरील भारतीय वनस्पतींना टाकण्यात येणार आहे.
या सर्व कामात राष्ट्रिय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतात. यासाठी चतुश्रृंगी देवस्थानची पुर्व परवानगी घेऊन सातत्याने महाविद्यालय काम करत आहेत. या वर्षी राष्ट्रीय सेवा योजने चे 100 विद्यार्थी व प्रा. कुमोद सपकाळ (कार्यक्रम अधिकारी), डाॅ. मंजूषा कूलकर्णी, डाॅ. गोविंद कांबळे सह कार्यक्रम अधिकारी हा कार्यक्रम राबवित आहेत.
या उपक्रमाला तिन्ही शाखांच्या उपप्राचार्य, प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मार्गदर्शन केले आहे. पी. ई. सोसाइटीचे सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर व डॉ. प्रकाश दिक्षित, ऊपकार्यवाह यांनी कौतुक केले.








