गणेशोत्सव सजावट स्पर्धात सुस रोड परिसरातील सोसायट्यांनी पटकावले प्रथम क्रमांक.

0
slider_4552

पाषाण :

पाषाण परिसरातील विविध हौसिंग सोसायटी साठी कोकाटे तालीम मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या सजावट स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सजावट प्रकारामध्ये क्रिस्टल गार्डन हाऊसिंग सोसायटीचा प्रथम क्रमांक आला, पर्यावरण पूरक गणेश उत्सव या प्रकारात कृष्णकमल सोसायटीचा प्रथम क्रमांक आला, पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे या प्रकारात माउंट व्हर्ट ग्रँड सोसायटीचा प्रथम क्रमांक आला, उत्कृष्ट कला व क्रीडा आयोजन या प्रकारामध्ये अलंकापुरी सोसायटीचा प्रथम क्रमांक आला, तर सांस्कृतिक उपक्रम या प्रकारामध्ये स्वामी समर्थ सोसायटीचा प्रथम क्रमांक आला.

पुणे शहर भाजपा चिटणीस राहुल कोकाटे व मयुरी कोकाटे यांच्या वतीने यावर्षीही मोठ्या उत्साहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाषाण परिसरातील 31 सोसायट्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. फेसकॉम महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष अरुणजी रोडे, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अनुजा बाली, सेवा सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तोडकर, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक भारती यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी राहुल कोकाटे यांचे आभार मानले व असे समाज उपयोगी उपक्रम सतत राबवावे व नागरिकांचा सहभाग वाढवावा, तसेच नागरिकांचे एकमेकांशी संवाद वाढवून परिसरातील सांस्कृतिक वातावरण, पर्यावरणाचे संरक्षण, व नागरी सुविधा सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही नागरिकांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.

रत्नाकर मानकर, वंदना सिंग, रघुनाथ उत्पात, उत्तम जाधव यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रज्वल कोकाटे, दत्ता ववले, अभिजीत देशपांडे, प्रवीण आमले, अभिषेक पिंजन यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले.

See also  सोमेश्वरवाडी येथील सचिन दळवी यांची भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदी निवड..