रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी

0
slider_4552

मुंबई :

आयोध्या येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात येणार आहे.

22 जानेवारी रोजी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून पाहूणे निमंत्रित करण्यात आले आहेत. हा सोहळा आणखी महत्त्वपूर्ण होण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध शाळा आणि संस्थांनी 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली होती. तर काही राज्यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यातच आता केंद्राने देखील केंद्रीय आस्थापना आणि औद्योगिक प्रतिष्ठान 22 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश दिले आहेत.

See also  देशातील पहिली स्वदेशी युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' भारतीय नौदलाकडे सुपूर्द, भारतीय नौदलाला मिळाला शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित ध्वज.