पुढील चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार

0
slider_4552

पुणे :

उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मागील दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात गारठा आहे. बुधवारी (दि.17) सर्वात कमी तापमान हे जळगावात होते. तेथे 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

कोरड्या हवेमुळे आणि उत्तर भारतातील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गारठा राहणार आहे. बहुतेक ठिकाणी धुके पडून पहाटे दृष्यमानता कमी होण्याचा अंदाज आहे. बुधवारी जळगावात 9.3, नाशिकमध्ये 11.5, पुण्यात 12.0, औरंगाबादमध्ये 11.6 आणि बुलढाण्यात 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरात सर्वाधिक 33.5 कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कर्नाटक ते विदर्भ, अशी वाऱ्याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यभरात हवेत आद्रर्तचे प्रमाण वाढले आहे.

See also  २ -३ महिन्यात संपूर्ण देशाचे लसीकरण अशक्य : अदर पूनावाला