महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला न जुमानणाऱ्या 12 हॉटेलवर गुन्हा दाखल

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिकेने नुकतीच हॉटेलवर अतिक्रमण कारवाई केली होती. मात्र महापालिकेची ही कारवाई न जुमानता पुन्हा शेड उभारून अतिक्रमण पूर्ववत करणाऱ्या 12 हॉटेलवर महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत.

मुंढव्यातील वॉटर्स, ओरिला, अनवाइड, हिंगोणे, कार्निव्हल, बॉटल स्पॉट, मासा, चिलीज, घोरपडीतील क्यू बार, पेटाहाऊस, स्पाइस फॅक्टरी व आकारी अशा 12 हॉटेलवर गुन्हे दाखल केले आहेत.

वारंवार कारवाई करूनही हॉटेलमालक पुन्हा बांधकाम आणि शेड उभे करत आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल केलेल्या हॉटेलांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवून त्यांचे दारूविक्रीचे परवाने रद्द केले जाणार आहेत.

दरम्यान कर्वे रस्ता, नळ स्टॉप भागात फ्रंट व साइड मार्जिनमध्ये टेबल टाकून व्यवसाय करणाऱ्या 19 हॉटेलवर महापालिकेने शुक्रवारी (दि.24) कारवाई केली आहे.

See also  पुणे शहर भाजप च्या युवा मोर्चा च्या युवा वॉरियर्स या नविन विभागाची कार्यकारिणी जाहीर.