मेट्रोच्या कामामुळे आजपासून गणेशखिंड परिसरात वाहतूक बदल

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषिजी चौक ते शिवाजीनगर कोर्टा मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आज शनिवार (दि.1) पासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत.

या कालावधीत गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी गुरुवारी (दि.30) पत्रकार परिषदेत दिली.

 *वाहतूक बदल पुढील प्रमाणे –*

*पुणे विद्यापीठ चौक –*

औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरील चौकात येणाऱ्या फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश आहे. (मार्ग- ब्रेमेन चौक औंध रस्त्याने सरळ पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारा मधून उजवीकडे वळून व्हॅग्निकॉम चे मुख्य प्रवेशद्वारातून गणेशखिंड रस्त्यावर येतील.) मालवाहतूक करणारी वाहने, पीएमपी आणि लक्झरी बसेसना प्रवेश बंद राहील.

*पर्यायी मार्ग : शिवाजीनगर, डेक्कन परिसरात जाण्यासाठी*

ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून- साई चौक उजवीकडे वळून सिंफनी चौक (रेंजहिल्स) डावीकडे वळून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या कार्यालया समोरून उजवीकडे वळावे. तेथून कृषी महाविद्यालयातील रस्त्याने न. ता. वाडी चौक- तेथून सरळ सिमला चौकातून पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

*आरटीओ पुणे स्टेशन, नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी*

ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- डावीकडे वळून बोपोडी चौकमार्गे किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई चौकातून खडकी पोलिस ठाण्यालगतच्या रेल्वे अंडरपासमार्गे किंवा युनिट चारसमोरून सरळ पोल्ट्री अंडरपास मार्गे जावे.

हिंजवडी, सांगवी परिसरातून सेनापती बापट रस्त्याकडे येणाऱ्या पीएमपी बसेस परिहार चौक- डावीकडे वळून बाणेर रस्त्यावरून विद्यापीठ चौकमार्गे धावतील.

*आर.बी.आय. समोर*

रेंजहिल्स चौकापासून पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी रस्ता : वाहनांना रेंज हिल्स कॉर्नर डावीकडे वळून रेंज हिल्स रस्त्याने सिंफनी सर्कल उजवीकडे वळून गुन्हे शाखेच्या युनिट चार समोरून शिवाजीनगर, डेक्कन परिसराकडे जाण्यासाठी उजवीकडे वळून कृषी महाविद्यालयांमधून न. ता. वाडी चौक आणि तेथून सिमला ऑफिस चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

See also  पुण्यात बांधकाम, उद्याने, मैदाने आणि वॉशिंग सेंटरसाठी एसटीपीच्याच पाण्याचा वापर बंधनकारक ?

आरटीओ, पुणे स्टेशन परिसर, नगर रस्त्याकडे जाण्यासाठी युनिट चारच्या कार्यालयासमोरून रेल्वे अंडरपासमधून पोल्ट्री फार्म चौकातून इच्छित स्थळी जातील.

*सीओईपी’ जवळ वाहतूक*

सिमला ऑफिस चौकातून सीओईपी वसतिगृहाच्या बाजूने स. गो. बर्वे चौकाकडे प्रवेश बंद राहील.

*पर्यायी मार्ग : सिमला ऑफिस चौकातून संचेती*

रुग्णालयासमोर उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक. किंवा सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालयाजवळ अंडरपासमधून कामगार पुतळा चौक- उजवीकडे वळून न्यायालयासमोरून इच्छित स्थळी जातील. संचेती अंडरपास ते कामगार पुतळा चौक या मार्गावर दररोज रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

*पर्यायी मार्ग : सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालय*

चौक- उजवीकडे वळून- स. गो. बर्वे चौक मार्गे जावे किंवा संचेती चौकातून डावीकडे वळून इंजिनिअरिंग कॉलेज चौक- उजवीकडे वळून आरटीओ चौकमार्गे जावे. पुणे-मुंबई महामार्गावरून पोल्ट्री फार्म चौकातून रेल्वे अंडरपासमार्गे रेंज हिल्सकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

*पर्यायी मार्ग : पोल्ट्री फार्म चौकातून पुणे-मुंबई महामार्गावरून चर्च चौक- डावीकडे वळून खडकी पोलिस ठाण्या जवळील रेल्वे अंडर पासमधून साई चौकातून इच्छित स्थळी जातील.*