पाणी गळती थांबविण्यासाठी गुरुवारी पुण्यातील या भागातील पाणी पुरवठा रॉहणार बंद

0
slider_4552

पुणे :

पर्वती जलकेंद्र अंतर्गत असलेल्या MLR टाकी वरून भवानी पेठ कड़े जाणाच्या 600 मिमी व्यासाच्या एम. एस. लाईनवर स्वारगेट मेट्रो स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात गळती होत असून सदर गळती तातडीने थांबविण्या करिता गुरुवारी (दि.25) पंपिंग अखत्यारीतील परिसरात पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच शुक्रवारी (दि.26) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे,अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.

*पाणीपुरवठा बंद असणारा भाग* :

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर  शंकर शेठ रोड परिसर, गुरुवार पेठ

बुधवार पेठ

काशेवाड़ी

कार्टरगेट परिसर

गंज पेठ

भवानी पेठ

नाना पेठ

लोहिया नगर

सोमवार पेठ

अरुण वैद्य स्टेडीयम परिसर

घोरपडी पेठ

लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर

पर्वती दर्शनचा काही भाग

मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग

सारसबाग परिसर

खड़कमाळ आळी

शिवाजी रोड परिसर

मुकुंद नगर

महर्षि नगर चा काही भाग

टीएमव्ही कॉलनी

मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत

अप्सरा टॉकीज परिसर

मीरा आनंद परिसर

श्रेयस सोसायटी

*तरी नागरिकांनी पाणी पुरवठा बंदची नोंद घेत योग्य ते नियोजन करावे असे आव्हाहन महापालिकेने केले आहे.*

See also  आंबिल ओढा सीमा भिंतीचे काम कधी पुर्ण होणार ?