राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात अवकाश उड्डाणावर निर्बैंध

0
slider_4552

पुणे :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे येथे सिंबायोसिस विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवकाश उड्डानावर निर्बंथ घालण्यात आले आहेत.

28 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 29 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी,ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केिले आहेत.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

See also  बँक फोडून 51 लाखांची रोकड पळवणाऱ्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या