महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे’ या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

0
slider_4552

पुणे :

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री अचानक आंदोलनाला सुरुवात केली. या विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील लाल बहादूर रस्त्यावर अचानक ठिय्या मांडला. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा येत्या 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली

खरे तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे एमपीएससीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. एम पी एस सी च या निर्णयाला विरोध करत पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत

दरम्यान अचानक आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. लाल बहादूर रस्त्यावर वर्दळीच्या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाल्याने वाहतुकीला अडथळा झाला. तर उपस्थित पोलिसांनी विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.

See also  पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, संचालक मंडळाची बोनस व बक्षिसाला मान्यता