गुरूवर्य कै. शंकरराव कानिटकर स्मृती प्रित्यर्थ’ २७ वी राज्यस्तरीय खुली शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न…

0
slider_4552

पुणे :

पी ई सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय (स्वायत्त) गणेशखिंड, आणि डिपार्टमेंट आॅफ परफाॅरमिंग आर्टस्, माॅडर्न महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यामाने ‘गुरूवर्य कै. शंकरराव कानिटकर स्मृती प्रित्यर्थ’ २७ वी राज्यस्तरीय खुली शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्धाटन पी ई सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख सर यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेमधे ५८ स्पर्धकांनी नोंदणी केली. त्यातील दुसऱ्या फेरीसाठी २४ स्पर्धकांची निवड केली गेली. त्यातील २२ स्पर्धकांनी गाणे सादर केले.
यामधील विजेते :
१.भक्ती पवार, रु १००००/- प्रथम पारितोषिक
२.गणेश आलम, रु ७०००/- द्वितीय पारितोषिक
३.केतकी घारपुरे,रु ५०००/- तृतीय पारितोषिक.

उत्तेजनार्थ पारितोषिके
१. प्राजक्ता शेंद्रे, रु १००० रोख व प्रशस्तिपत्र
२. संपदा राजने, रु १००० रोख व प्रशस्तिपत्र
या सर्व विजेत्यांना बैठक फाउंडेशन तर्फे त्यांच्या संस्थामधे गाण्याची संधी मिळणार आहे.

पं. राजेंद्र कंदलगावकर प्रमुख पाहुणे म्हणाले गायकीचा रियाज चांगला ठेवा. प्रत्येक जागा चांगली घ्या. स्पर्धा हि निमित्त आहे. थोड्या वेळात चांगले गाण्याची संधी या स्पर्धांनी मिळते. गायकी समृध्द करा.

या स्पर्धेचे परिक्षण करताना जेष्ठ गायिका जयश्री रानडे यांनी स्पर्धक सगळेच खुप तयारीचे होते. गुरुवर श्रध्दा ठेवा. गुरुसमोर राहून विद्या घ्या असे मार्गदर्शन केले. तसेच
जेष्ठ गायक जयंत कैजकर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.
पेटीवर सुरंजन जायभाय , देवेंद्र पटवर्धन व तबल्याची साथ प्रा श्रीपाद शिरवळकर व संगीत कुलकर्णी यांनी केली. महेश जगताप यांनी विद्यावाणीसाठी संपुर्ण कार्यक्रमाचे रेकाॅडिंग केले.

स्पर्धाकांचे मनोगत प्राजक्ता शेंद्रे व पिनाक सप्रे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी श्रीदत्त गायकवाड, संचालक, विद्यावाणी एफ. एम. रेडिओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डाॅ ज्योती गगनग्रास, डाॅ शुभांगी जोशी उपप्राचार्या माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड व डाॅ अमृता ओक, उपप्राचार्या माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

स्वाती पटवर्धन व विद्यार्थीनी संपदा दिवेकर यांनी सूत्रसंचलन केले. डाॅ अश्विनी जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रास्तविक डाॅ. वर्षा जोशी यांनी केले.हि स्पर्धा सुरु करुन २७ वर्ष यशस्वी करण्यामागे डाॅ. वर्षा जोशी यांचे परिश्रम आहेत. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्माचे संयोजन केले.

See also  स्व. राजीव गांधी यांची ७८ वी जयंती निमीत्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित अभिवादन.

त्यांना संयोजनात प्रा पुष्कर लेले, विभाग प्रमुख यांनी मदत केली. प्रा. प्रसाद देशमाने, प्रा. शुभंकर वाघोले, प्रा. डॅा. अश्विनी जोशी, प्रा.श्रीपाद शिरवळकर, प्रा. सोनल कुलकर्णी, प्रा.डॅा. उत्तरा ओक, प्रा. डॅा. मंजुषा कुलकर्णी , प्रा. प्रियांका भामरे तसेच दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी यांनी संयोजनात सहकार्य केले.