कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत मुलींना रु १२०० ते १५०० पाॅकेटमनी मिळावा अशी व्यवस्था केली जाईल : चंद्रकांत पाटील

0
slider_4552

पुणे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन आँफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्युट्स यांच्या संयुक्त विद्यामाने  चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार व संवाद समारंभ अयोजित केला होता. या प्रसंगी प्रा रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन आँफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्युट्स उपस्थित होते.

डाॅ शैलेंद्र देवळाणकर,संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य व प्रा डाॅ सुरेश गोसावी, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राजीवजी जगताप, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पहेलगाव हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्दांजली देऊन कार्यक्रमला सुरवात झाली यात उ्च्चशिक्षणातील समस्यांवर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी सवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले,”तुमच्या सगळ्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. लगेचच मिटींग घेऊन उच्च शिक्षणातील बहुतेक प्रश्न मार्गी लावण्यात येतील. विद्यर्थीनींची फी माफी बरोबरच ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत मुलींना रु १२०० ते १५०० पाॅकेटमनी मिळावा अशी व्यवस्था केली जाईल. संस्थानी कार्पोरेट मधील सी एस आर फंडाचा उपयोग शैक्षणिक कारणासाठी करावा अशी सुचना त्यांनी दिली.

प्रा रामदास झोळ यांनी सेल्फ फंडिग संस्थांचे प्रश्न मांडले. शिष्यवृत्ती, EWS, प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे असे अनेक महत्वाचे विषय त्यांनी मांडले. प्रवेश परिक्षा ही सगळ्यांसाठी एकच असावी म्हणजे प्रवेशाला उशिर होणार नाही व शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होतील याबाबत काही तरी ठोस पावले उचलावित अशी विनंती त्यांनी केली.

प्रा डाॅ सुरेश गोसावी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वांगीण विषयावर चर्चा केली.

डाॅ गजानन एकबोटे म्हणाले ,”मागील वर्षीच्या रिकाम्या जागा बघता विनंती आहे की पुढची दोन वर्ष ज्या शाखांच्या जागा रिकाम्या आहेत त्या नविन काॅलेजला परवानगी देताना विचार व्हावा हि विनंती.याचबरोबर वसतिगृह, शिक्षवृत्ती या विषयावर ठोस निर्णय मिळाल्यास व असा संवाद संस्थाचालकांशी ठेवल्यास शिक्षण प्रसार व प्रचाराचे काम सोपे होईल असे ते म्हणाले.

See also  पुणे बार असोसिएशन तर्फे 'ज्युडीशियल कोलोकिया' पुष्प ३ चे  आयोजन...

प्रास्ताविक व स्वागत डाॅ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी, पाहुण्यांचा परिचय प्रा शामकांत देशमुख, सचिव पी ई सोसायटी, निवेदन डाॅ निवेदिता एकबोटे, आभार प्रदर्शन, डाॅ कल्याणी जोशी प्राचार्य माॅडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, ईशस्तवन  प्रियांका भट यांनी केले.

या कार्यक्रमाला ३५० च्या वर संस्थाचालक प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, आजिवन मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्रचार्य संचालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.