बहुरूपी भारूड टाळी वाजवावी, गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची : डाॅ भावार्थ देखणे यांचे देखणे सादरीकरण 

0
slider_4552

पुणे :

पी ई सोसायटीच्या माॅडर्न ईंजिनिअरींगच्या रौप्यमहोत्सवा निमित्त आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे रुपकात्मक संत साहित्याचे सादरीकरण बहुरूपी भारूड या कार्यक्रमात सादर झाले. डाॅ भावार्थ देखणे विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, पुणे यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात सादर केले.

सुरवातीला प्राचार्य डाॅ. कल्याणी जोशी यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या दैदीप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांनी सांस्कृतिची जतन करण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात. डाॅ. रामचंद्र देखणे हे लोककलेचे उपासक होते. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रसिध्द किर्तनकार डाॅ. भावार्थ देखणे असेच चालु ठेवतील अशा शुभेच्छा दिल्या.

डाॅ. देखणे यांनी वासुदेव, कडकलक्ष्मी, भारूड असे कलाप्रकार सादर केले. त्यांना अभय नलगे यांनी साथ दिली. कार्यक्रमाची भैरवी लोकप्रिय गायक अभय गांधी यांनी सादर केली. त्यांचाच पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रमुख पाहुणे प्रा. डाॅ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. प्रमुख उपस्थिती ना चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे आध्यक्ष प्रा. डाॅ. गजानन र. एकबोटे, कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी प्र कुलगुरू डाॅ पराग कालकर उपस्थित होते.

कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ. जोस्त्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ. निवेदिता एकबोटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्या डाॅ ,सुहासिनी ईटकर यांनी केले.

See also  पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना, काय आहे कारण ?