महापालिका निवडणुकीसाठी पुणे महानगर पालिकेकडून प्रारूप आराखडा जाहीर…

0
slider_4552

पुणे :

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महानगर पालिकेकडून प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ चे जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यायच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत.

प्रारूप प्रभाग रचनासंदर्भात नागरिकांच्या हरकती/ सूचना २२ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील,असे पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

प्रभाग रचना महानगरपालिकेने नगर रचना विभागाला पाठवली होती. यामध्ये महानगरपालिकेने ३ प्रभाग, ३ सदस्य प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव नगर रचना विभागाला गेल्यानंतर ३ सदस्य प्रभाग न ठेवता ५ सदस्य एकच प्रभाग केला.

See also  बाणेर-बालेवाडी समान पाणी पुरवठा योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना