सोमेश्वरवाडी :
सनी निम्हण यांनी नागरीकांना, युवकांना महराजांचा बारकाईने इतिहास समजावा म्हणून प्रदर्शन भरवले आहे. महाराजांच्या मुद्रा कशा असतील याचे सुंदर पेंटिंग रेखाटले गेले आहे. या प्रदर्शनाने तरुणांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार आहे. या मध्ये विशेष करुन महाराजांची यंत्रणा कशी होती. शिवाय त्या काळात जीपीएस नसताना देखील कशा पद्धतीने सुरतची अतिशय नियोजनबद्ध लूट केली होती. महाराज कशा पद्धतीने संदेश वहन करायचे. महाराजांची तलवार विषयी माहिती नागरीकांना प्रदर्शन वेळी दिली, चित्रकार नितीन आडके यांनी दिली.
माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम पुणे विभागामध्ये ( PABBS west festival) पाषाण, औंध, बाणेर, बोपोडी, सोमेश्वरवाडी या भागातील नागरिकांसाठी, सुपर सनी विक – आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राजमुद्रा प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोपटराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, भारत जोरे, धनंजय बामगुडे, बाळासाहेब बामगुडे, संतोष सपकाळ, संजय माझीरे, ज्ञानेंद्र हुरसुले (राणे क्लासिक) , विजयन मेनन (शिवरंजन टॉवर) पूर्वंत काका(सोमेश्वर पार्क), विजय भोसले(सोमेश्वर पार्क), विवेक जगताप (बेलस्कॉट सोसायटी) यांच्या उपस्थिती मधे झाले.
या वेळी सनी निम्हण यांनी स्वतः तरुणांना पेंटिंग मधील महाराजांच्या इतिहासाची माहिती दिली. तरुणांनी आणि नागरिकांनी महाराजांचा इतिहास बारकाईने पाहावा व त्यांचे विचार काही अंशी तरी अंगीकारावे या अपेक्षेने हे प्रदर्शन भरलेले आहे असे निम्हण यांनी सांगितले.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कधीही न बघितलेल्या भावमुद्रांचे सदर प्रदर्शनाचे आयोजन अजय काकडे, शिवम दळवी, विनय निम्हण, ऋषी निम्हण, अतुल काकडे, गोकुळ जाधव, विष्णू काकडे, अविनाश गायकवाड, अमोल जोरे, रोहित किरदत्त, अनिमेश दातार, निखिल आरगडे आदि यांनी केले.
सदर प्रदर्शन दि. १९ फेब्रुवारी २०२१ ते दि. २१ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० ते रा. ८ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
स्थळ:- संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, (पेठ जिजापुर), पाषाण.