सरकारी मंत्रालये आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची गरज : नितीन गडकरी

0
slider_4552

नवी दिल्ली :

देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. पेट्रोल तर इतिहासात पहिल्यांदा शंभराच्या घरात पोहोचले आहे. काही ठिकाणी तर झालेही आहे. यामुळे वाहनधारकांचे पार कंबरडे मोडले आहे. आणि अशातच केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सरकारी मंत्रालये आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची गरज असल्याचं नितिन गडकरी यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, मी माझ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांनाही त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची सूचना गडकरी यांनी केली.

असे केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल असा दावा गडकरी यांनी केला. स्वयंपाकाच्या गॅस ऐवजी इलेक्ट्रिक कुकींग साहित्यासाठी सरकारने अनुदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गॅसपेक्षा इलेक्ट्रिक कुकिंग पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  ओबीसी आरक्षणाची यादी तयार करण्याचे अधिकार आता राज्यांना