औंध :
योगीराज पतसंस्थेतर्फे महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदी ह.भ.प.संजयबापू बालवडकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी शामराव हुलावळे, पुणे शहर युवा कार्याध्यक्ष पदी ह.भ.प.शेखर महाराज जांभुळकर, अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या सप्ताह दिंडी पुणे जिल्हा प्रमुख बाळासहेब शितोळे, तसेच शिवसेना उपशहर प्रमुख पदी राजेंद्र धनकुडे व राष्ट्रीय तालीम संघाच्या सदस्य पदी राजेंद्र मुरकुटे यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, वरील सर्व मंडळी संस्थेशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीने संस्थेशी जोडलेली आहेत तसेच त्यांना प्रत्येकाच्या क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेचे निमित्त साधून शुभेच्छा व सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे सभासद बरबडे हे स्वत:हाची रिक्षा घेऊन बाणेर येथे विजय सेल्स च्या बाहेर उभी करुण आत जाऊन बाहेर परत येईपर्यंत त्यांची संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली. ही त्यांची करुण कहाणी ऐकून संस्थेतर्फे त्यांना आर्थिक सहाय्य देऊन नवीन रिक्षा ह्या प्रसंगी मान्यवरांच्या देण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना शेखर महाराज जांभुळकर यांनी संस्थेचे आभार मानले व सांगितले की, बरेच लोक सत्कार काही तरी फायद्या साठी करतात पण आज योगीराज ने केलेला सत्कार हा शुद्ध व निस्वार्थपणे केलेला आहे व वेळोवेळी विविध माध्यमातून गरजूंना संस्था मदत करत असते म्हणूनच परमेश्वर या संस्थेला प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर घेऊन गेला आहे.
याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र मुरकुटे, संचालक वसंत माळी, अमर लोंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके, भाग्यशाली पठारे, व सर्व स्टाफ उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे स्वागत संचालक राजेश विधाते यांनी केले तर सर्वांचे आभार शाखाध्यक्ष शंकरराव सायकर यांनी व्यक्त केले.