चीन :
अंतराळात राज्य करण्याच्या उद्देशाने चीनने एकामागून अनेक रॉकेट्स प्रक्षेपित केल्याने जगाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनने 21 टनाचे लॉन्ग मार्च 5 बी रॉकेट लॉण्च केले होते. मात्र एवढा महाकाय रॉकेट अनियंत्रित अवकाशात गेल्यानंतर अनियंत्रित झाला असून तो केव्हाही पृथ्वीवर आदळू शकतो, अशी माहितीही तज्ञांनी दिली आहे. मात्र चीनचे हे रॉकेट पृथ्वीवर आदळल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असेही तज्ञांनी म्हटले आहे.
न्यूयॉर्क, माद्रिद आणि बीजिंग सारख्या शहरांमध्ये हे रॉकेट कोठेही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी चीनचे हे रॉकेट पृथ्वीवर आदळेल, असा इशारा अमेरिकन सरकारने दिला आहे. सुमारे 21 टन वजनाच्या रॉकेटमुळे अमेरिकेचे न्यूयॉर्क, स्पेनमधील माद्रिद आणि चीनच्या बीजिंग शहरासारख्या दाट लोकवस्ती असलेल्या महानगरांवर आदळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
शनिवारी (ता.8) चीनचे ही रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करू शकते. चिंताजनक बाब म्हणजे चीनचे 100 फुट लांबीचे आणि 16 फुट रुंदीचे हे रॉकेट प्रति सेकंड 4 मैलाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे उपग्रह दिशा दर्शकांनी (सॅटेलाइट ट्रॅकर्स) ने नोंदवले आहे. अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता माइक हावर्ड यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच, अमेरिकेच्या स्पेस कमांडचे चीनच्या या मार्च5 B या रॉकेटच्या हालचालींवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. परंतु ही रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत आल्याशिवाय ते नक्की कोठे आदळेल याबाबत कोणतीही महियाती अद्याप आम्ही देऊ शकत नसल्याचे माइक हावर्ड यांनी स्पष्ट केले आहे.
तथापि, पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या अवकाशातील अनेक वस्तूंवर नजर ठेवणारे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी याबाबत स्थानिक माध्यमांना माहिती दिली आहे. सध्या हे रॉकेटचा मार्ग न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग येथून उत्तरेला तर दक्षिणेकडील चिली आणि न्यूझीलंडकडे वळविला जात आहे. या शक्यता पाहता, हे चिनी रॉकेट या प्रदेशात कुठेही आदळू शकते. चिंताजनक बाब म्हणजे हे समुद्रावर किंवा सामान्य लोकसंख्या असलेल्या भागातही पडण्याची शक्यता जोनाथन मॅकडॉवेल यांनी यांनी वर्तवली आहे. तथापि, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर या रॉकेटचा काही भाग जळून जाऊ शकतो, पण उरलेला भाग पृथ्वीचे मोठे नुकसान करू शकतो असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, चीनचे रॉकेट अवकाशात अनियंत्रित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मे 2020 मध्ये लाँच मार्च 5 बी रॉकेटचा मुख्य भाग अनियंत्रित झाला होता आणि त्याचा ढिगारा अटलांटिक महासागरात पडला. हे रॉकेट कोसळण्यापूर्वी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरांवर गे ले होते.