बालेवाडी :
सध्या कोरोनाच्या महामारी मुळे सगळी कडे रक्तपुरवठा कमी पडत असल्याने अनेक संघटना, संस्था, रक्तदानासाठी पुढे आले. त्यामध्ये आपल्या पुण्यातील पुणे महानगर परिवहन मंडळाने पुढाकार घेऊन बालेवाडी येथील बस डेपो मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पुण्याची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या पी एम पी एम एल ने दाखवलेली रक्तदान बाबतची ही जागृकता खूप कौतुकास्पद आहे, कामगार कामावर नसताना केवळ पी एम पी एल ने आव्हान केल्यावर येवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांनी सहभाग घेऊन रक्तदान केले ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे असे मत भाजपचे प्रकाश बालवडकर यांनी व्यक्त केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ आयोजित बालेवाडी बस डेपो येथील रक्तदान शिबिरास भेट दिली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पी एम पी एल चे अध्यक्ष राजेंद्र जगताप, व्यवस्थापक दतात्रेय झेंडे, डेपो मॅनेजर माळी, मारुती बालवडकर, विठ्ठल साखरे, दतात्रेय मोरे, हरिभाऊ तापकीर आदी उपस्थित होते.
संपूर्ण पुणे शहरात पी एम पी एम एल कडून पंधरा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. या रक्तदान शिबिरात सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता. बालेवाडी येथील डेपो मध्ये एकूण १६४ जणांनी रक्त दान केले. तर पुणे व पिंपरी चिंचवड मिळून एकूण ४१६९ येवढ्या मोठया प्रमाणात पी एम पी एल कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान संकलित केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी प्रकाश बालवडकर यांनी पी एम एम पी एल अधिकाऱ्यांचा सन्मान केला व रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या.