पृथ्वीवरील हवामानात होत असणाऱ्या बदलांसाठी ग्लोबल वार्मिंग (Global Warming) जबाबदार असल्याचे मानले जाते, ज्यामुळे बर्याच देशांना, विशेषत: अमेरिकेला (America) पूर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घटनांसाठी ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदल जबाबदार आहेत, परंतु आता नव्या अभ्यासात या हंगामी घटनांना पृथ्वीच्या शेजारी असलेल्या चंद्राशी जोडले गेले आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या नासाने (NASA) केलेल्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि चंद्राच्या कक्षाचे ‘स्पंदन’ पृथ्वीवरील विनाशकारी पूरासाठी कारणीभूत ठरु शकते. 21 जून रोजी नेचर क्लायमेट चेंज या जर्नलमध्ये हा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला होता.
2030 नंतर सतत पूर येईल
जेव्हा दैनंदिन येणारी भरती ही सरासरी उच्च भरतीपासून सुमारे 2 फूटांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला किनारपट्टीवरील भागात ‘आपत्तीजनक पूर’ म्हणतात. या पूरांमुळे व्यवसायांचे बरेच नुकसान होते कारण अनेकदा पाणी रस्त्यावर आणि घरात शिरते आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. नासाच्या अभ्यासानुसार 2030 च्या मध्यापर्यंत या ‘आपत्तीजनक पूर’ जीवनावर सतत आणि अनियमित परिणाम करतील.
अभ्यासानुसार, बहुतेक अमेरिकन किनारपट्ट्यांमध्ये कमीतकमी एका दशकात उच्च समुद्राची भरतीओहोटीत तीन ते चार पट वाढ होईल. अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की या पुराचा संपूर्ण वर्षभर परिणाम होणार नाही परंतु काही महिन्यांत याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होईल. नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की, समुद्रसपाटीच्या सखल प्रदेशात वाढणार्या पुरामुळे सर्वाधिक धोका आहे, तसेच येणार्या काळात धोका अधिक वाढेल.
समुद्र सपाटीसह चंद्राचा कंपन धोकादायक
ते म्हणाले, चंद्राचे गुरुत्व, वाढती समुद्राची पातळी आणि हवामान बदल यामुळे जगभरातील आपल्या किनारपट्टीवर समुद्रकिनारी पूर वाढेल. चंद्राचा पुरामुळे होणाऱ्या परिणामाविषयी स्पष्टीकरण देताना हवाई विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक फिल थॉम्पसन (Fhil Thompson) यांनी सांगितले की चंद्राच्या कक्षेत फिरण्यास 18.6 वर्षे लागतात. ते म्हणाले की, पृथ्वीवरील वाढती उष्णता यामुळे चंद्राच्या कंपनांना समुद्राच्या वाढत्या समुद्राशी जोडणे धोकादायक आहे.