दिल्ली कोर्टात गोळीबार, गँगस्टर गोगी ठार ! तीन जणांचा मृ्त्यू

0
slider_4552

नवी दिल्ली :

दिल्ली कोर्टात गोळीबार झाल्याची ताजी बातमी समोर येत आहे. रोहिणी कोर्टात गोळीबार झाला असून गँगस्टर गोगी ठार झाला आहे.या गोळीबारात अन्य चार लोकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राजधानी दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात हा गँगवॉर झाला आहे. शुक्रवारी दुपारी कोर्टात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र ऊरफ गोगी याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात गोळीबार झाला आहे.

पोलिसांनी हल्लेखोरांना ठार केलं आहे. या शूटआऊटमध्ये आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात एक गँगस्टर गोगीसह दोन हल्लेखोरांचा समावेश आहे. अन्य व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

गोगी तिहार जेलमध्ये होता, शुक्रवारी त्याला सुनावणीसाठी कोर्टात आणण्यात आलं होतं. याच दरम्यान रोहिणी कोर्टात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. वकिल बनून आले होते हल्लेखोर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिल बनून कोर्टात आले होते. ज्यांनी गँगस्टर गोगीवर गोळीबार केला.

स्पेशल सेलची टीम गोगीला कोर्ट रुममध्ये घेऊन गेली होती. जिथे ही घटना घडली आहे. असं म्हटलं जात आहे की, दिल्लीच्या टिल्लू गँगनं गोगीची हत्या केली आहे. जे दोन हल्लेखोर ठार झाले आहे. त्यापैकी एकाच नाव राहुल असून त्याच्यावर 50 हजारांचं बक्षीस आहे.

See also  मास्क चा वापर अजुन किती दिवस ? निती आयोगाचा नागरीकांना सल्ला