राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी…. !

0
slider_4552

पुणे :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या. यावेळी पुणे शहरातून 4 शहरांत मेट्रो जाऊ शकतात आणि ते ही कमी खर्चात, असं स्वप्न बोलून दाखवताना गडकरींनी 4 शहरांसाठी अफलातून मेट्रो प्रकल्प सांगितला.

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

गडकरींची ब्रॉडगेज मेट्रोची भन्नाट संकल्पणा

गडकरींनी पुणे शहरातून 4 शहरांसाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पणा बोलून दाखवली. ते म्हणाले, नागपूर मेट्रोची निर्माण किंमत 350 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे. तर पुणे मेट्रोची निर्माण किंमत 380 कोटी रुपये प्रति किलोमीटर , पण एक नवीन मेट्रोची संकल्पना आहे. ह्या मेट्रोची निर्माण किंमत फक्त एक कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी राहील. मी कन्सलटेन्ट म्हणून फुकट काम करायला तयार आहे.

ही मेट्रो सध्याच्या ब्रॉडगेज रेलवे ट्रॅकवर धावेल आणि यासाठी भारतीय रेल्वेसोबत मीटिंग सुद्धा झाली आहे. आम्ही हा प्रकल्प नागपूर परिसरात सुरु करणार आहोत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपण सुरु करु शकतो.

जिल्ह्यात मेट्रोचे जाळे वाढणार”
पुण्यापासून कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नगर, लोणावळा या मार्गावरील ब्रॉडगेजवर आठ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये विमानासारखी सोय असणार आहे. याचे तिकीट एसटी बसएवढं असेल. ही मेट्रो 140 किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे लोकांचे पैसे वाचतील आणि पर्यावरणालाही फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

See also  पर्वती येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका लोकार्पण सोहळा संपन्न. 

इथेनॉलचा वापर झाला पाहिजे

गडकरींनी सांगितलं की, पुणे देशातील सर्वात प्रदुषित शहरांमध्ये अग्रेसर आहे. पुण्याला जलप्रदूष आणि वायुप्रदुषणापासून मुक्त करावं. पुण्याला प्रदुषणापासून अजित दादांनी मुक्ती द्यावी. मला पेट्रोल डिझेल बंद करायचं आहे आणि त्यासाठी इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. ब्राझिल मध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत.

इथेनॉलचा ६५ रुपये लिटर दर आहे. रशियातून हे तंत्रज्ञान आणले आहे. सध्या तीन पंप पुण्यात सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पंप सुरू करा. साखर कारखान्याची स्थिती सुधारेल. महाग पेट्रोल घ्यावे लागणार आहे. पुण्यात प्रदुषण मुक्ती झाली पाहिजे. यासाठी इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. फ्लेक्स इंजिनच कंपन्यांना बनविले पाहिजे आणि असा आदेश काढणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पुल बांधून देईन, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, रस्त्यांची कामे लवकर उरका ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, असा सल्ला अजित पवार यांनी पुण्यात दिला. तर, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर भर दिला पाहिजे. असं देखील त्यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘सध्या केंद्र, राज्य आणि मनपा या तिन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवूऩ कामं लवकर पूर्ण केली पाहिजेत. राज्याच्या विकासकामांत नितीन गडकरींचे भरीव असं योगदान असतं. विकासकामांसाठी राज्य सरकार नेहमी केंद्रासोबत असेल आणि सर्वांनी एकत्र समन्वय साधून काम केल्यास पुणे शहराचा विकास वेगाने होईल, असे त्यावेळी अजित पवार म्हणाले.