सोमेश्वरवाडी येथे दिवाळी निमित्त आयोजित सुर तेची छेडीता कार्यक्रम उत्साहात पार

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, औंध येथील नागरिकांसाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून बहारदार गीतांचा “सुर तेची छेडता” हा दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रम तसेच गौरी गणपती सजावट तसेच डान्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून बहारदार गीतांचा आनंद उपभोगला.

यावेळी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होऊन, ही दिवाळी खऱ्या अर्थाने सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पसरवत आहे, ही अनुभूती दिली. या अश्या चैतन्यमय वातावरणात सर्वांसोबत आनंद साजरा करताना मनाला खूप समाधान लाभले. विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षिसे मिळविणाऱ्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन. अशाच प्रकारे मोठ्या उत्साहात इथून पुढे देखील विविध कार्यक्रमात सहभाग घेवून स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

“सुर तेची छेडता” हा दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोपटराव जाधव, खंडू अरगडे, तानाजी काकडे, रोहिदास घोलप, पागिरे सर, जितेंद्र भुरुक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेविका स्वाती निम्हण, चौधरी मॅडम, मंजुश्री निम्हण, यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विजय कापरे, सुनील काशिद, संजय निम्हण, काशिनाथ दळवी, संजय बालवडकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, संतोष अरगडे, सुनील खुळे, संतोष जोरे, अजय काकडे, संजय माझिरे, प्रमोद अरगडे, बाळा रानडे, विक्रम जाधव, संतोष सपकाळ, आदि उपस्थित होते.

खाली स्पर्धकांना स्पर्धेत बक्षीस मिळाली :

डान्स पुणे डान्स : २६८ स्पर्धकांनी भाग घेतला.
१० जण अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यातून विजेते झालेले स्पर्धक.

प्रथम क्रमांक : अर्णव पवार
द्वितीय क्रमांक : कात्या सानप
तृतीय क्रमांक : अक्षय घाम
चतुर्थ क्रमांक : समीर मेश्राम

गणपती सजावट स्पर्धा :

प्रथम क्रमांक : राजेंद्र पाषाणकर
द्वितीय क्रमांक : राजू अरगडे
तृतीय क्रमांक : गणेश भिशे
चतुर्थ क्रमांक : पुनम विशाल शिंदे
पाचवा क्रमांक : रमेश यादव

See also  म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ

गौरी सजावट स्पर्धा :

प्रथम क्रमांक : वंदना चांदेरे
द्वितीय क्रमांक : मेगा उपलाने
तृतीय क्रमांक : अश्विनी चव्हाण
चतुर्थ क्रमांक : शिवानी बांदल
पाचवा क्रमांक : वृषाली रणपिसे