पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर अखेर पुण्यात येण्याची शक्यता.

0
slider_4552

पुणे :

पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर अखेर पुण्यात येत आहेत.या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घघाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे.

महानगर प्राधिकरणाकडून या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही हजेरी लावणार आहेत. डिसेंबरअखेरीस हा सोहळा करण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटरच्या मेट्रोचे काम आहे. या कामांचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीएने केले आहे.

हिंजवडी मेट्रोसाठी केंद्राने बाराशे कोटी रुपये दिलेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या डिसेंबर अखेर होऊ शकते. या 2 कार्यक्रमांशिवाय स्वतंत्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात पंतप्रधानांना गुंतवू नये, अशी देखील चर्चा सुरु आहे.

See also  'एलजीबीटी' समुहासाठी पुण्यात प्रथमच 'ब्युटी पार्लर कोर्स', 'स्माईल', 'पुणेरी प्राईड फाऊंडेशन' आणि 'यार्दी ग्रुप'चा स्तुत्य उपक्रम