सोमेश्वरवाडीत भरवण्यात आलेला बाल मेळावा उत्साहात पार…!

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वतीने परिसरातील लहान मुलांसाठी बाल मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. बाल मेळावा भरविला गेल्यामुळे लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या बाल मेळाव्यात मोठ्या उत्साहाने लहान मुलांनी सहभाग घेतला. या मेळाव्यामध्ये विविध खेळ खेळत जादूगार आणि उंटाची सफर मुलांनी मोठ्या आनंदात अनुभवली.

या कार्यक्रमाची माहिती देताना युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की, परिसरातील लहान मुलांना बऱ्याच दिवसापासून मोकळेपणाने खेळण्याची संधी प्राप्त होत नव्हती. विविध खेळाचे साहित्य आणून लहान मुलांना त्याचा आनंद उपभोगता यावा म्हणूनच हा बाल मेळावा आयोजित केला होता. या लहान छोट्या मुलांनी विविध खेळांचा आनंद घेतलेला पाहून मनाला समाधान लाभले.

यामध्ये विविध जादूगाराचे  खेळ मुलांना पाहिला मिळाले, या वेळी मुलांना चॉकलेट सुद्धा वाचण्यात आली. उंटाची सफर करताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. असा मेळावा नेहमीच आयोजीत केला जावा अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. लहान मुलांनी सचिन दळवी यांचे आभार मानले. बाल मेळाव्यास मुलांचा उत्साह वाढविण्याकरता भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे आणि युवा नेते लहू बालवडकर यांनी आवर्जून भेट दिली.

See also  पाषाण येथे महिला दिना निमित्त काही महिला रणरागिनीनचा विशेष महिला गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.