सोमेश्वरवाडी, औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात महाशिवरात्र मोठया उत्साहात संपन्न

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वर वाडी येथील सोमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी आकर्षक फुलांनी मंदिर सजावट केली होती. सोमेश्वर वाडी येथे फार मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली जाते. यावर्षी देखील लाखो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला.

महाशिवरात्र निमित्त बालेवाडी येथील श्री बालेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बाणेर येथील प्राचीन कालीन पांडवकालीन लेणी बानेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती. भाविकांनी दर्शनासाठी पहाटे पासूनच रांगा लावून दर्शन घेतले.

पाषाण गावातील वाकेश्वर मंदिर, सुतारवाडी येथील महादेव मंदिर, बावधन, सुस, येथील महादेव मंदिर, औंध येथील पेशवेकालीन श्री नीळकंठेश्वर मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्री साजरी झाली.

See also  साफसफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी जीवन चाकणकर यांच्याकडून मिठाई वाटप