सोसायटी प्रीमियर लीग प्रथम क्रमांक “अमर सेरेनिटी” तर युवा प्रीमियर लीग “मुरकुटे युवा मंच” याने पटकावला.

0
slider_4552

पाषाण :

सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बावधन परिसरात स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्यावतीने सोसायटीतील नागरिकांसाठी “भव्य सोसायटी प्रीमियर लीग” आणि परिसरातील युवा खेळाडूंसाठी “युवा क्रिकेट लीग” भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी च्या मैदानावर करण्यात आले होते. ही स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

या स्पर्धेची माहिती देताना भाजपा युवानेते स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, क्रिकेट खेळामुळे सोसायटी वर्ग एकमेकांशी बांधला जातो. या स्पर्धेमुळे सोसायटी वर्ग आणि युवा खेळाडू यांचा चांगला संगम होऊन या उत्साहात स्पर्धा अतिशय चुरशीने खेळली गेली. विशेषता सोसायटी वर्गाने मोठ्या उत्साहात या स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला. ही स्पर्धा सोसायटी आणि युवा पिढीसाठी आनंददायी ठरली. येणाऱ्या पुढील काळात देखील असेच चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवून सर्वांची सेवा करत राहणार आहे.

“सोसायटी प्रीमियर लीग” पारितोषिक विजेते :

प्रथम क्रमांक – अमर सेरेनटी

द्वितीय क्रमांक – प्रोफाईल इमपीरियर

तृतीय क्रमांक – मोरया रेसिडेंसी

“युवा प्रीमियर लीग” पारितोषिक विजेते :

प्रथम क्रमांक – प्रशांत मुरकुटे युवा मंच

द्वितीय क्रमांक – AB 11

तृतीय क्रमांक- अभि दगडे युवा मंच

See also  रतन टाटा यांना व्यवसाय आयडॉल मानणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी, सूसगाव येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट मध्ये शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या दिल्या सूचना.