जागतिक महिला दिनानिमीत्त योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला स्टाफचा सन्मान…..

0
slider_4552

औंध :

योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमीत्त महिला स्टाफचा विशेष भेट देऊन नगरसेविका स्वप्नाली सायकर व ज्योती कळमकर यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच महिला दिनाच्या दिवशी 1 कोटी 10 लाख रुपयांची ठेव संस्थेत जमा झाली.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, आज जगामध्ये महिला दिन साजरा करतात, त्यानिमीत्त संस्थेत कार्यरत असलेल्या महिला स्टाफचा सन्मान दरवर्षी संस्थेच्यावतीने केला जातो. संस्थेच्या आर्थिक प्रगती मध्ये महिला स्टाफचे मोठे योगदान आहे तसेच महिला स्टाफ हा अत्यंत प्रामाणिक आणि मनापासुन काम करत असतात. तसेच महिला नगरसेविका स्वप्नाली सायकर व ज्योती कळमकर यांनीही 5 वर्षात उत्कृष्ट काम केले आहे हे आजच्या महिला दिनाच्या प्रसंगी सांगायला अभिमान वाटतो असेही यावेळी सांगितले.

नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि ज्योती कळमकर यांनी सर्व स्टाफला शुभेच्छा दिल्या तसेच योगीराज पतसंस्थेत करत असलेला महिलांचा सन्मान हा कौतुकास्पद आहे असेही यावेळी नमुद केले.

संस्थेच्या संचालिका रंजना कोलते यांनी याप्रसंगी महिला स्टाफने आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती सांगितली.

याप्रसंगी संचालक राजेश विधाते, वसंतराव माळी, संचालिका रंजना कोलते, संस्थेचा सर्व स्टाफ व खातेदार उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.

See also  सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेचा 'सोमेश्वर चषक' आर.डी.एक्स संघाने पटकावला.