पाषाण :
कोरोना माहामारीत अनेक उद्योगधंदे बंद पडले अनेकांचे हातचे काम गेले. अंजली झिंगाडे यापैकीच एक. एका अपंग शिक्षण संस्थेत त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली.




त्यांची दोन मुलं, पती अशा कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. या हलाखीची परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकन त्यांना कठीण झालं होत. सूनीताताई कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन रोहिदास कोकाटे यांच्या कृष्णगंगा फाउंडेशनने त्यांना मदतीचा हात दिला आहे!
त्यांचा उदरनिर्वाह चालवा म्हणून कृष्णगंगा फाउंडेशनने त्यांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिली आहे. जेनेकरून शिलाई काम करून त्यांना पुढील काळात आर्थिक हातभार लागेल.
या कार्यक्रमप्रसंगी कोथरुड युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कृष्णगंगा फाउंडेशनच्या मार्गदर्शिका सूनिताताई कोकाटे, मनिशाताई कोकाटे, बचत गट अध्यक्ष जयाताई मेनजोगी, मनिशाताई संदीप कोकाटे आणि मोहिनीताई कोकाटे आदी उपस्थित होते.








