पुन्हा जर सोमय्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर CISF जवानांना शूट ऍट साईटची ऑर्डर

0
slider_4552

न्यू दिल्ली :

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आतापर्यंत दोन वेळा गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत असले तरी या वेळी हल्ल्याची दखल थेट दिल्लीतून घेण्यात येताना दिसत आहे.

CISF ने प्रकरणाची गंभीर दखल घेत आपल्या जवानांना आदेश दिले आहेत.

शनिवार, २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्थानकाबाहेर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात सोन्या यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे सुमय्या यांच्या हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि तिथं शिवसेनेच्या नेत्यांना अटकही झाली. तर या आधी पुणे महापालिकेच्या आवारात सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

झेड सुरक्षा असलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणे ही खूपच गंभीर बाब मानली जात आहे. CISF ने या हल्ल्यांची दखल घेतली आहे. CISF ने आपल्या जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देतानाच पुन्हा जर सोमय्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर शूट ऍट साईटची ऑर्डर दिल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने समजते.

सोमय्या यांच्यावर मुंबईत दगडफेक झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहसचिव आणि गृह राज्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना घडल्या प्रकारची माहिती दिली होती.

See also  लसीकरणाच्या अपॉइंटमेंट साठी आता हेल्पलाईन नंबर...