इंडोनेशिया :
भारतीय हॉकी संघाने आशिया चषक 2022 सुपर-4 मधील त्यांचा पहिल्या सामन्यात जपानवर दणदणीत विजय मिळवला आहे.
मॅचमध्ये जपानने टीम इंडियाचा 2-5 असा पराभव केला होता. या विजयासह भारताने जपानवरच्या अपयशाचे यशात रूपांतर केले. टीम इंडियाच्या मनजीत आणि पवनने प्रत्येकी एक गोल केला. त्याचवेळी जपानसाठी ताकुमा निवाने एकमेव गोल केला.
या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. या सामन्याचा पहिला क्वार्टर भारताच्या नावावर होता. भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी मनजीतने पहिला गोल केला. तर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत पोहोचले होते. जपानने गोलशून्य बरोबरी साधली होती.
तिसऱ्या क्वार्टरदरम्यान टीम इंडियाने आक्रमक खेळ करत आणखी एक गोल केला. 40व्या मिनिटाला भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. या क्वार्टरमध्ये भारत आणि जपानच्या खेळाडूंमध्ये संघर्ष सुरूच होता. मात्र क्वार्टरअखेर जपानला बरोबरी साधता आली नाही. भारताची आघाडी अबाधित राहिली. चौथ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने जपानला गोल करू दिला नाही. अशा प्रकारे भारताने शानदार विजय आपल्या खिशात घातला.
याआधी आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने इंडोनेशियाला 16-0 ने मागे पाडले होते. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला सामना अनिर्णित राहिला. भारतीय हॉकी संघाने यावेळी आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू मनिंदरला दुखापत झाली होती. यामुळे त्याला बाहेर जावे लागले. मनिंदर 50 व्या मिनिटाला जपानी खेळाडूकडून चेंडू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान चेंडू हॉकीला लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर आदळला. मनिंदरच्या ओठावर दुखापत झाल्याने त्याला बाहेर जावे लागले.