आता ED ची वक्रदृष्टी राज्याच्या कृषी विभागावर, आघाडी सरकारची उघडणार ‘फाईल’?

0
slider_4552

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे ED चौकशीचा ससेमिरा लागलाय.यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या सूक्ष्म विभागातुन ED ने काही महत्त्वाची कागदपत्रे मागवलेली आहेत. तत्कालीन सरकारने याप्रकरणी अनेकांचं निलंबन देखील केलं होतं. तब्बल चारशे ते पाचशे जणांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आता ED ने जी कागदपत्रे मागितली आहेत त्यानंतर या प्रकरणात चैकशी होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाच्या साहित्यामध्ये करोडोंचा भष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

राज्याच्या कृषी विभागाचीही ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचं समजतंय. राज्यात वर्ष 2008 ते वर्ष 2011 या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिचंन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. ठिबक आणि तुषार सिंचन साहित्याच्या खरेदीत झालेला हा घोटाळा त्या काळी खूपच गाजला होता. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून काही कागदपत्र मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आधीच महाविकास आघाडी नेत्यांच्या मागे ED चौकशीचा ससेमिरा असताना आता थेट महाराष्ट्र सरकारच्यामागे ED कारवाईचा ससेमिरा लागणार आहे. आता यामध्ये ED कशा प्रकारे कारवाई करणार ? कुणाला चौकशीसाठी बोलावणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

See also  राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही : शरद पवार