पुणे :
शहरातील विद्युत व पंपिंग विषयक कामे तसेच जलशुद्धीकरण केंद्रांच्या तातडीच्या देखभाल दुरुस्ती साठी येत्या गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.
परंतू त्या मध्ये मंगळवारी सायंकाळी तांत्रिक कारणास्तव अचानक बदल करत शहरातील पाणी पुरवठा गुरूवार ऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
गुरूवारी लग्नाचा मोठा मुहूर्त आहे. त्यामुळे नगरसेवकांनी पाणी पुरवठा बंदचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती. प्रशासनाने या मागणीचा विचार करुन लोकांची गैरसोय टाळण्यासाठी गुरूवार ऐवजी शुक्रवारी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.