जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारतात !

0
slider_4552

मुंबई :

भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’ बनवली आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. आता भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे. अशी ट्रेन अद्यापही जगात कुठेही सुरू केलेली नाही.

ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये मोती बिंदू, कर्करोग अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे.

या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत.‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे.

See also  राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत