राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून पी. टी. उषा, इलयाराजा सहित चार नावं जाहीर..

0
slider_4552

नवी दिल्ली :

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही नावं दक्षिण भारतातली आहेत.

धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत.

पीटी यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीटी उषा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.

इलयाराजा यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची कामे अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.

वीरेंद्र हेगडे यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. त्यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले महान कार्य पाहण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील.

https://twitter.com/narendramodi/status/1544692614867329031?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1544692614867329031%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  टाटा कंपनीने एअर इंडिया ताब्यात घेतल्याने विमानात चांगले बदल होण्यास सुरुवात : पी. चिदंबरम