गंगाधाम सोसायटीच्याजवळ असलेल्या काकडे वस्तीत अग्नितांडव.

0
slider_4552

पुणे:

पुण्यात पुन्हा मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आता ही आग कोंढवा परिसरात लागली आहे. या भागात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्याजवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली होती.

पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे. आगीमुळे धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. रविवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास लागलेली आग आहे. या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या.

पुण्यात सकाळी ८.३० च्या सुमारास लागलेली आग दुपारी १२ वाजता नियंत्रणात आली. अग्निशमन दलाने आगीपूर्ण विझवली अन् कुलिंगचे काम वेगाने सुरू केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

See also  घरगुती गॅस दरवाढ व महागाई विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे शहरात 58 ठिकाणी आंदोलन