औंध :
ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मुसळे आयोजित वरिष्ठ पोलीस अधिकारी व वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांची औंधच्या ट्राफिक व अतिक्रमण विषयासंदर्भात नागरिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी लवकरच उपायोजना करून औंधची ट्रॅफिक सुरळीत करू असे अतिरिक्त पोलीस आयुक्ता मनोज पाटील यांनी आश्वासन दिले.
औंध मधील भाले चौक, मेडिपॉइंट हॉस्पिटल चौक, आंबेडकर चौक व मॅकडॉनल्ड्स चौक या चारही चौकात वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय बनलेला आहे. त्याला अनेक कारणे असून अतिक्रमण , चौकाचं पुरेसं रुंदीकरण न होणे , रस्ता रुंदीकरण न होणे रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग या सर्व बाबी त्यास कारणीभूत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी व सर्व संबंधित विभागांना एकत्र आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी सांगितले.
या बैठकीत नागरिकांनी हिरहिरिने सहभाग घेऊन आपले मत व्यक्त केले नुसते प्रश्न उपस्थित न करता त्यावर उपाययोजनाही सांगितल्या.
नागरिकांच्या प्रश्नांना अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी शांतपणे व समर्पक उत्तरे दिले. पुणे शहरात टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून वाहतूक जास्तीत जास्त सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू असल्याच यावेळी मनोज पाटील यांनी सांगितले. मी काही जादूची कांडी करणार नाही परंतु प्रत्यक्षात शक्य त्या सर्व उपाययोजना करून औंधचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निश्चित मार्गी लावू अशा आश्वासन यावेळी श्री मनोज पाटील यांनी दिले.
या बैठकीलाअतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, ॲड. डॉ. मधुकर मुसळे, नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, उपायुक्त ट्राफिक हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त नंदिनी वैग्यांनी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक मीनल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन उत्तम भजनावळे, पुणे मनपा उपायुक्त संदीप खलाटे (अतिक्रमण विभाग ), सहाय्यक आयुक्त गिरीश दापेकर, रमेश वाघमारे कार्यकारी अभियंता पथविभाग, स्वाती गणपिले कनिष्ठ अभियंता पथविभाग, रंजीत मुटकुले उप अभियंता बांधकाम विभाग, कामयानी घोलप कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग, प्रसन्न देसाई अर्बन डिजाइनर, मयूर मुंडे, विनय शामराज, प्रशांत शितूत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.