सनी सुपर विक मध्ये मॉम्स मॅजिक स्पर्धत मधुरा फडके प्रथम.

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

PABBAS फेस्टिवल अंतर्गत सनी सुपर विक मध्ये मॉम्स मॅजिक स्पर्धा गोविंदा गार्डन सोमेश्वर वाडी येथे आयोजित केली होती, या स्पर्धेत एकूण 648 स्पर्धक सहभागी झाले होते, शेवटच्या फायनल राऊंड साठी 9 स्पर्धक होते. या स्पर्धसाठी परीक्षक म्हणून नविन पॅट्रिक, सुजेन पंडित, श्रीपाद पालवे यांनी काम पाहिले.

या स्पर्धसाठी विजेत्या डिश पुण्यातली चांगल्या रेस्टॉरंट ला पाठवली जाईल. एक महिना त्याचा येणारा मार्झिन विजेत्या स्पर्धकास दिला जाणार आहे. अशी आगळीवेगळी स्पर्धा महिलांना प्रोत्साहित करण्याचे उद्देशाने राबविण्यात आली असे या प्रसंगी सनी निम्हण यांनी सांगितले.

तसेच या स्पर्धसाठी सनी निम्हण यांच्या मातोश्री माजी नगरसेविका स्वाती निम्हण व त्यांच्या पत्नी मधुरा निम्हण आवर्जून भेट दिली. त्यांनी स्पर्धक सोबत चर्चा करुन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. स्पर्धकाने बनवलेले पदार्थांची आवडीने चवही चाखली व त्याला तेवढेच उस्फुर्त दादही दिली.

या स्पर्धेत स्पर्धक गृहिणींनी वांग्याची पुरी, हैद्राबादी दम बिर्याणी, खान्देशी शेव भाजी, कोंबडी, खीमा रोल, वांग्याचे चुलीवर भरीत भाकर, असे वेगवेगळे पदार्थ बनवले. स्पर्धा अतिशय चुरशीची झाल्याने स्पर्धेचे विजेते निवडताना परीक्षकांना बरीच कसरत करावी.

स्पर्धेत निवेदक म्हणुन कपिल पाटील यांनी काम पाहिले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक पीसीएमसी जालिंदर शिंदे आणि प्रदिप कंद उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल :

प्रथम क्रमांक – मधुरा फडके

द्वितीय क्रमांक – तेजस्विनी मोरे

तृतीय क्रमांक –

१. संजना साळुंके

२. दिपाली पाटील

 

See also  मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : भाजपचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने.