बालेवाडी :
पुणे स्मार्ट सिटी व महावितरणचे अधिकारी यांच्या समवेत बाणेर-बालेवाडी भागातील विविध विषयांवर समन्वय बैठक नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या ऑफिस मध्ये पार पडली. विकासकामे करत असताना अधिकाऱ्यांची योग्य समन्वय साधने व नियोजनबद्ध कामे करणे अत्यंत महत्वाचे असते. त्या दृष्टीने बालेवाडी येथील समस्या कशा दूर करता येईल यासाठी ही बैठक घेण्यात आली.
याबद्दल माहिती देताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, यावेळी बालेवाडी मुख्य चौक, दसरा चौक, साई चौक ते मिटकॅान कॅालेज अशा विविध ठिकाणच्या ओव्हर हेड तारा भुमिगत करणे तसेच पार्कलॅंड येथील स्विचटेशन, बाणेर मुख्य रस्त्यावरील पदपथाचे काम सुरु असताना महावितरण अधिकार्यांना येणार्या अडचणी याबाबत चर्चा केली व याठिकाणचे प्रलंबित प्रश्न अधिकार्यांसमवेत चर्चा करुन सोडवले.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, स्मार्ट सिटीचे गोडबोले साहेब, अभियंता अभिजित केवडकर, विर पवार, वंदना कट्टे, स्वामी, अमित कारंडे, अनिल आतकरे, महावितरण चे अधिकारी श्री.पंडीत दांडगे, मनोज नेमाडे उपस्थित होते.