महाळुंगे गावातील हनुमान मंदिराच्या रंग कामाला सुरुवात

0
slider_4552

महाळुंगे :

महाळुंगे गावातील हनुमान मंदिराच्या रंग कामाचा शुभारंभ मा. नगरसेवक अमोल बालवडकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने लक्ष्मण पाडाळे पाटील यांनी मंदिराच्या रंग कामासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता असून आपण त्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा दोन्ही मान्यवरांकडून व्यक्त केली.

यावेळी बोलताना पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे रंग कामासाठी तत्काळ एक लाखाची मदत केली आहे. तसेच रंग काम मोठे असल्याने मी आणि अमोल बालवडकर मिळून उर्वरित कामाकरिता कोणतेही कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत आहे. मंदिराच्या कामासाठी कमी पडणारा निधी उपलब्ध करून देऊ. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हातात घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही त्यांना साथ देण्याचे काम आम्ही करू आणि म्हाळुंगे गावच्या मंदिराचे रंग काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतल्याची खात्री यावेळी देत आहे.

यावेळी मा. नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, मंदिराचे काम हे कोणाचे वैयक्तिक काम नसून गावाचे काम आहे. या चांगल्या कामास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही. मंदिराच्या रंग कामाच्या निधीसाठी कोणतीही कमतरता जाणवू देणार नाही. रंग कामाचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले असून उर्वरित काम पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी मी आणि गणेश कळमकर घेत आहे. महाळुंगे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले असले तरी गावाचे गावपण मंदिरा मुळे टिकून राहते. त्यामुळेच या मंदिराचे रंग काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचा शब्द या वेळी देत आहे.

यावेळी लक्ष्मण पाडाळे पाटील, शांताराम पाडाळे (पोलीस पाटील), हिरामण पाडाळे पाटील, गुलाबराव गायकवाड, बापू पाडाळे, गजानन पाडाळे, किसन सुतार, तुषार हगवणे, संतोष पाडाळे लोकेश पाडाळे किरण पाडाळे, दिलीप शेडगे, काळुराम गायकवाड, ज्ञानेश्वर पाडाळे, पै. समीर कोळेकर, सुरेश लोणकर, भगवान खैरे (मा. नायक सुभेदार), भूषण पाडाळे पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.