पुणे :
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकासाठी ओबीसी सहित आरक्षण सोडत आज जाहिर झाली आहे. तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने आरक्षण जाहिर झाले असून उमेदवारांची धाकधुक आज संपली आहे. पुणे शहरात तीनचे एकूण ५७, तर दोनचा एक असे ५८ प्रभाग होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची सदस्यसंख्या ही १७३ असणार आहे. प्रभाग क्रमांक १२,१३ आणि प्रभाग क्रमांक १४ या प्रभागात ओबीसी आरक्षण महिला पडल्याने सर्वच समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून बरेच बदल पाहायला मिळू शकतात.
निकालानुसार ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आज पुणे महापालिकेचे बालगंधर्व रंगमंदिर सभागृहामध्ये आज जाहिरात प्रकाशित केल्याप्रमाणे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. अनुसुचीत जाती महिला, महिला आरक्षित अ व ब जागा (२ महिला १ पुरूष) या पडली आहेत. 31 मार्च मार्च रोजी 31 मे रोजी काढण्यात आलेली अनुसूचित जाती व जमाती आरक्षणे ‘जैसे थे ‘ ठेवत उर्वरित प्रभागांमध्ये ओबीसी व खुला पुरुष महिलाही आरक्षणे आज करण्यात आली.
येणाऱ्या पुढील काळात ओबीसी आरक्षण काय बदल घडवणार हे पाहणे रोचक ठरेल. या ओबीसी महिला आरक्षण मुळे अनेक सर्वसाधारण इच्छुक पुरूष उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.