सुसगाव येथे दहावी बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
slider_4552

सुस :

सुस येथे अमोल बालवडकर फौंडेशन, दिशा सोशल फोरम व न्यु इंग्लिश स्कुल, सुसगाव यांच्या वतीने आयोजित इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, या १० गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येकी २५०००/- देण्यात येईल. तसेच लवकरच सुस गाव येथे पुणे महानगपालिकेच्या माध्यमातुन इंग्रजी माध्यमिक शाळेचे देखिल नियोजन केले जाईल असे आश्वासन देत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील काळात देखील येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मदत केली जाईल. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच न्यू इंग्लिश स्कूल ला ब्लॅक बोर्डस (फळा )व सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आली.

तसेच राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू कु शंतनू बांदल, राज्यस्थरीय कब्बडी खेळाडू निखिल ससार, तेजस काळभोर, ओमकार काळभोर, तसेच महाराष्ट्र कर विभाग आयुक्त पदी नियुक्ती झालेले कु.योगेश बांदल यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर मा.नगरसेविका ज्योतीताई कळमकर, मा. सरपंच मीरा देवकर, मा. सरपंच नलिनीताई ससार, मीनाताई ससार, भजनी मंडळ शांताबाई चांदेरे, कमल कोळेकर आशा चांदेरे, मा.उपसरपंच दिशाताई ससार, मा. चेअरमन दत्तात्रय चांदेरे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते वसंत चांदेरे, रासप पुणे अध्यक्ष आप्पा सुतार, उपसरपंच अनिकेत चांदेरे, मा.उपसरपंच बाळासाहेब निकाळजे, ॲड.विशाल पवार, सा.कार्यकर्ते राजाभाऊ ससार, राजाभाऊ भोते, मनोज चौधरी, विठ्ठल सुतार, न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक विश्वास सर,अतुल खांदवे, नंदूशेठ साळुंके, समीर पारखी, पप्पु फणसे, मारुती नरके, चंडेल काका, राऊत सर, संदीप बांदल, कैलास ससार, योगेश पाडाळे, निखिल चांदेरे, अक्षय चांदेरे, अक्षय भुंडे, निखिल ससार, अनिल शेवाळे, दिलीप चांदेरे, बाळा जाधव, सुनील शिंदे, प्रमोद निरवणे, पत्रकार गणेश अभिमानें, उमेश ससार, एकांश ससार, संतोष चांदेरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न