पुणे :
मनसे नेते वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन जबाबदारी दिली आहे. वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.







मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्याा आदेशानुसार पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांना मावळ लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांनी शिरूर लोकसभा तर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, या घडामोडींवर भाष्य करत मोरे यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.ते म्हणाले, साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ. कारण मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय. आणि हो बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो, त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का ! म्हणून तर म्हणलो मी येतोय. असं मोरे म्हणाले आहेत.







