औंध :
औंध येथील नेहरू तरुण मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ च्या वतीने अथर्वशीर्ष पठण सहस्त्रवर्तन आयोजन करण्यात आले होते. राष्ट्र सेविका समिति पौरोहित्य वर्गाच्या महिलांनी विश्वशांती, सर्वांच्या कल्याणासाठी आणि सर्व नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात यासाठी संकल्प करून गणपती बाप्पा ची प्रार्थना केली.







यावेळी महिलांनी अथर्वशीर्ष, ब्रम्हणस्पती सूक्त, त्रिसुपर्ण म्हटले या प्रसंगी नेहरू तरुण मंडळ आणि औंध परिसरातील व पंचक्रोशीतील अनेक महिला उपस्थित होत्या. मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्या सर्व महिलांचे हळदीकुंकू लाऊन स्वागत केले आणि सत्कार केला
नदी प्रदूषण निर्मूलन व्हावे यासाठी गणेशोत्सव हे महत्वाचे मध्यम आहे, असे मत नेहरू तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पौरोहित्य वर्गाच्या सर्व महिलांनी व्यक्त केले.









