केंद्र सरकारचा अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी फेटाळला…

0
slider_4552

नवी दिल्ली :

देशातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारचा अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

त्यांनी ऑफर नाकारण्यामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे सांगितले आहे. भारताचे वर्तमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल आहेत. त्यांनी औपचारिकपणे 30 जून 2017 पासून त्यांचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. मधेच त्यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला होता, मात्र आता त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एएनआयशी बोलताना मुकुल रोहतगी म्हणाले की, ‘भारत सरकारचा प्रस्ताव न स्वीकारण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही.’ मुकुल रोहतगी यांनी यापूर्वी 2014 ते 2017 दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमध्ये एजीची जबाबदारीही सांभाळली होती.

वेणुगोपाल यांना 2017 मध्ये जबाबदारी सोपवण्यात आली

रोहतगी यांच्यानंतर 15 जुलै 2017 रोजी वेणुगोपाल यांना एजीची जबाबदारी देण्यात आली होती. यासोबतच त्यांना त्यांच्या कार्यकाळात तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान, त्यांनी सूचित केले होते की, सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण एजी म्हणून आपला प्रवास सुरु ठेवणार नाही. 2020 मध्ये, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही, त्यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु केंद्र सरकारने (Central Government) त्यांना एजी म्हणून कायम राहण्याची विनंती केली होती.

अ‍ॅटर्नी जनरल पद?

भारत सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अ‍ॅटर्नी जनरल भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका बजावतात आणि सर्व कायदेशीर बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देतात. अ‍ॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.

See also  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश.