सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या सूस शाखेमध्ये अँनुअल स्पोर्ट्स मीट – 2022-23 चा प्रारंभ अत्यंत सळसळत्या उत्साहात साजरा झाला. नियोजन बद्ध आखणी आणि त्याबरहुकुम साजरा करण्याची पेरीविंकल ची परंपरा कायम राखली.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वतीपुजन व दीप प्रज्वलनाने करून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके गोल्डमन म्हणून ज्यांची ख्याती सर्वत्र आहे असे महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन योगेश धावडे , कोंढवे धावडेचे प्रसिद्ध उद्योजक चेतन धावडे, कुस्तीचे प्रशिक्षक बाळासाहेब ढमाले, प्रदीप साठे, दिनेश कंधारे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडीत व इतर मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून आपले खेळाडू मशाल घेऊन आले व मशाल प्रज्वलित करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. चेम्पियन योगेश धावडे , मा.बांदल सर व सर्व मान्यवर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
हेल्थ इस वेल्थ .. म्हणून सर्वांनी सुद्रुढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगून अभ्यासा बरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची असते असे सांगून खेळाचे महत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
तर खेळाने माणूस घडतो बरेच पैलू खेळाने विकसीत होतात त्यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे व खेळासाठी जे काही लागेल ते करण्याची तयारी ठेवली तर मेरी कॉम, सचिन तेंडुलकर, नीरज बनणे अवघड नाही असे पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सांगितले.
तर आनंदी जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे व प्रत्येक विद्यार्थ्यानी, पालकांनी व शिक्षकांनी किमान अर्धा तास तरी रोज व्यायामासाठी काढावा असे सांगून पेरिविंकल च्या सूस शाखेने स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून सर्व मुलांना तंदुरुस्ती कडे नेण्याचा संदेश दिला ही खरोखरच वाखाणण्याजोगी बाब आहे. आजकाल अभ्यासाबरोबरच क्रीडा व खेळ यांना पण खूप महत्व अभ्यासाबरोबरच खेळ व त्यात प्रावीण्य प्राप्त करणे खूप अभिमानाची बाब आहे. पेरीविंकलच्या सूस शाखेमधून एक तरी ऑलम्पिक वीर किंवा महाराष्ट्र केसरी व्हावा अशी अपेक्षा गोल्डमन योगेश धावडे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली.
स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून एक आगळा वेगळा उत्साही वातावरणात मान्यवरांच्या हस्ते शाळेचा झेंडा मानाने फडकाऊन व राष्ट्रगीताने ओपनिंग सेरेमनी करण्यात आली. त्यानंतर भूमीपूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खो-खो च्या ओपनिंग मँच साठी फीत कापून क्लपर वाजऊन मँच चा प्रारंभ करण्यात आला. सर्व खेळाडूंना मान्यवरांनी उत्तेजीत करून त्यांचा गौरव केला.
स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून नुकत्याच स्टेट लेवलला 100 मी धावण्यात सुवर्णपदक पटकावलेल्या श्रीजीत पडाळे याचे मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सर्व शिक्षक वर्ग आजच्या या आयोजनात सहभागी होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल स्वत: जातीने या शाखेत उपस्थित होत्या. स्पोर्टस डे चा सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी , क्रीडा शिक्षिका शैला परुळेकर यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने खेळाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. रांगोळी रेखाटन, फलक लेखन, सजावट या कामात सर्वांनीच हातभार लावला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रफुल्ला पाटील तर पाहुण्यांचे स्वागत सौ शुभा कुलकर्णी यांनी केले.