कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांची भेट..

0
slider_4552

कसबा :

मागच्या महिन्यात पार पडलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती. कसब्यात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली होती.

आता हे दोन्ही नेते निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांची खासदार गिरीष बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राच्या लोकार्पण सोहळ्यात भेट झाली आहे.

गिरीष बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. याच कार्यक्रमासाठी धंगेकर आणि रासने दोघेही एकत्र आल्याचं बघायला मिळालं. यावेळी दोघेही हसत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोघांनी मिळून भित्तीचित्राचं लोकार्पण केलं आणि एकमेकांसोबत हातही मिळवला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याने त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

यावेळी बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, 15 वर्ष एकत्रित पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे. तसेच हेमंत रासने यांना पुणे महापालिकेमध्ये चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव असल्याने आगामी काळात मतदार संघातील काम करतेवेळी निश्चित मला फायदा होणार आहे. मात्र, लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते. विजय आणि पराजय असतो आणि आपल्या खांद्यावर जी पताका असते. ती पुढे पुढे घेऊन जायची असते आणि मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही. पण, समाजाची सेवा करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  दिन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव शस्त्र : छगन भुजबळ